वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी

वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)

वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटं
चार लोक
  1. 2बटाटे
  2. 2वांगी मध्यम आकाराची
  3. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  4. 2 टेबलस्पूनलसूण खोबरे वाटण
  5. 1.5 टेबलस्पून वन कांदा लसूण मसाला
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे तीळ कुठ
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. कोथिंबीर
  9. फोडणीसाठी जीरे मोहरी
  10. 1 टीस्पूनमॅगी मॅजिक मसाला

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम ओम कढईमध्ये तेल गरम करावे आणि जीरे मोहरी हिंगाची फोडणी द्यावी त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतावा एकीकडे बटाटा आणि वांग्याच्या फोडी करून घ्याव्यात कांदा ट्रान्सपरंट भाजला की त्यामध्ये लसूण खोबर्‍याचे वाटण घालावे

  2. 2

    लसुन खोबऱ्याचे वाटण नाही चांगले भाजले की त्यामध्ये तिळकूट आणि शेंगदाण्याचे कूट घालून घ्यावे सोबतच कांदा-लसूण मसाला आणि मीठ घालून घ्यावे आवश्यक असल्यास थोडे तेलही घालावे आणि सर्व मसाला एकत्र छान परतावा थोडे पाणी घालून मसाला शिजू द्यावा

  3. 3

    मसाला शिजला की त्यामध्ये बटाटे वांग्याच्या फोडी घालाव्यात आणि शिकण्याकरता पाणी घालून घ्यावे सर्वात शेवटी मसाला घालावा आणि कोथिंबीर घालून गार्निश करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes