सात्विक मटार उसळ (matra usal recipe in marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
सात्विक मटार उसळ (matra usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ओल्या मटारच्या शेंगा सोलू न दाणे काढून घ्यावे किंवा फ्रोजन मटार घ्यावा. २ टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
- 2
कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी जीरे घालून तडतडल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्यावर हिंग घालून परतावे.
- 3
मग त्यात तिखट पूड, हळद, धणे जीरे पावडर, गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून मिक्स करुन परतावे.
- 4
त्यात मटार घालून मिक्स करुन ओलं खोबरं आणि थोडं पाणी घालून दोन शिट्या काढून मटार उसळ शिजवून घ्यावी.
- 5
मटार उसळ मधे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. ही सात्विक मटार मी उसळ नैवेद्यासाठी वाढली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15838647



टिप्पण्या