व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खडा मसाला चे साहित्य तेलावर खमंग भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर थोड पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. बारीक वाटप करावे.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात शहाजिरा, कांदा, आल- लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
- 3
टोमॅटो प्युरी करावी यात घालावी. परतून यात दिलेले मसाले घालून परतून घ्यावे. नंतर यात बारीक वाटप केलेला खडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
- 4
तेल सुटले की त्यात पनीर किसून घालावे.
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे. - 5
यामध्ये वर दिलेले भाजी उकडुन घ्यावे आणि या ग्रेव्ही त घालावे. 5/7 मिनिटे मंद आचेवर ठेवावे. कसुरी मेथी आणि मीठ चवीनुसार घालुन गॅस बंद करावा हि भाजी नान / रोटी सोबत खायला छानच.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15846344



टिप्पण्या