व्हेजीटेबल चाॅप (vegetable chap recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
संध्याकाळी काही तरी चटपटीत खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.
व्हेजीटेबल चाॅप (vegetable chap recipe in marathi)
संध्याकाळी काही तरी चटपटीत खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.
कुकिंग सूचना
- 1
बीट आणी गाजर पातळ लांब लांब कापावे. किसू नये. कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे फोढणीला दयावे. नंतर त्यात बीट, गाजर आणि सर्व मसाले घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- 2
भाजीत पाणी घालू नये. भाजी शिजत आली की त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा. पूर्ण सुकवून घ्यावे. वरून कोथिंबीर, शेंगदाणे घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून द्यावी.
- 3
नंतर तयार भाजीचे लांब आकाराचे रोल करून घ्यावे. मैदयामधये जरा पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्यावी. एक एक रोल मैदयामधये बुडवून नंतर ब्रेड करमस मध्ये घुळवून घ्यावे. असे दोन वेळा करावे.
- 4
नंतर तेलात मध्यम आचेवर डिप फ्राय करून घ्यावे. चटणी किंवा साॅस सोबत खावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15859346






टिप्पण्या