मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)

Asha Thorat @AshaThorat
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तेल घालून गरम करायला गॅस वर ठेवा. तेल गरम झाले की गॅस मध्यम आचेवर ठेवा.
- 2
आता तेलात कडिपत्ता व कांदा घालून गुलाबी रंगाचा होई पर्यंत भाजुन घ्या. टोमॅटो पण व्यवस्थीत परतून घ्या. थोड मीठ घालुन परता व झाकण लावून घ्या. मटकी स्वच्छ धऊन घ्या.
- 3
टोमॅटो तेलात विरघळला की मटकी तेलात टाका व थोडी भाजुन घ्या. तिखट, हळद, जीरे पावडर व धने पावडर घालून परता. पाणी घालून झाकण लावून घ्या. उसळ मंद आचेवर शिजू द्या. 15 मिनिटांनी झाकण काढून परत एकदा व्यवस्थीत परतून घ्या. परत झाकून ठेवा. 25 ते 30 मिनिटात उसळ छान शिजते कोथिबीर घालून गॅस बंद करा.
- 4
आपली चटकदार उसळ चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा. लिंबू पिळून तर ती अजूनच छान लागते
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15870872



टिप्पण्या