चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar

चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
कुकिंग सूचना
- 1
चिकन साफ करून मग स्वच्छ धुवून थोडं मीठ, हळद, तिखट पूड, धणे जीरे पावडर, आलं लसूण पेस्ट, दही आणि कसूरी मेथी घालून मिक्स करुन मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
- 2
पॅन मधे थोडं तेल घालून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घालून ब्राऊन होईपर्यंत परतावा मग त्यात काजू आणि बदाम घालून परतून एका प्लेटमधे काढून गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून बारीक प्युरी करून घ्यावी.
- 3
कुकर मधे तेल घालून त्यात काश्मीरी तिखट पूड, हळद, घालून लगेच थोडं पाणी घालावे म्हणजे तिखट करपत नाही आणि तर्रीला छान लाल रंग येतो. मग त्यावर मॅरीनेट केलेलं चिकन घालून, गरम मसाला पावडर घालून मिक्स करावा. आणि नंतर फ्राय केलेल्या कांदा टोमॅटोची प्युरी घालून मिक्स करुन थोडं पाणी घालून कुकर बंद करून पाच शिट्या काढून चिकन शिजवून घ्यावे.
- 4
चिकन शिजल्यावर त्यामधे एका वाटीत गरम कोळशाचे तुकडे किंवा कोळसा नसेल तर नारळाच्या करवंटीचे तुकडे गॅस वर गरम करून वाटीत घालून त्यावर बटर किंवा तुप घालून चिकनला झाकण लावून एक मिनिट बंद करावे. म्हणजे वाटीतला अंगारा (कोळशाचा तुपकट धूर) चिकन मधे मिक्स होऊन छान वास येतो आणि चिकनला छान चव येते. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सोबत कांदा, टोमॅटो आणि काकडीच्या गोल फोडी बरोबर चिकन अंगारा सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या