खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)

Chandrika Nayee
Chandrika Nayee @nayeechandrika

माझ्या मोठ्या मुलीची ही आवडती रेसिपी आहे. जेव्हा तिला ढोकळा खाण्याची इच्छा होते, तेव्ही मी हा पदार्थ तयार करते. तिच्यामुळे आमच्याही जीभेचे चोचले पुरवले जातात.

खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)

माझ्या मोठ्या मुलीची ही आवडती रेसिपी आहे. जेव्हा तिला ढोकळा खाण्याची इच्छा होते, तेव्ही मी हा पदार्थ तयार करते. तिच्यामुळे आमच्याही जीभेचे चोचले पुरवले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोग्रॅम बेसन
  2. 1 चमचालिंबूचे फुल किंवा अख्खा लिंबू
  3. 1 चमचासोडा
  4. 1 चमचाहळद
  5. 4 चमचेसाखर
  6. 1 ग्लासपाणी
  7. 3हिरव्या मिरच्या
  8. 5/6कढीपत्ता
  9. 3 चमचेतेल
  10. 1 चमचामोहरी
  11. चवीनुसारमीठ
  12. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन घ्या. त्यामध्ये साखर, हळद, मीठ आणि लिंबूचे फुल मिक्स करावे.

  2. 2

    आता पिठामध्ये पाणी मिक्स करावे व सर्व सामग्री नीट एकजीव करून घ्यावी. पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ढोकळ्याचं बॅटर नीट हलवून मिक्स करावे. चमच्याने व्यवस्थित ढवळल्यास बॅटर चांगलं तयार होते. साखर, लिंबू फुल आणि अन्य सर्व सामग्री पिठामध्ये विरघळणे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवावे. तसंच बॅटर जास्त पातळ होऊ देऊ नका.

  3. 3

    आता मोठा टोप घ्यावा आणि त्यामध्ये तीन ग्लास पाणी उकळत ठेवा.

  4. 4

    आता एक प्लेट घ्यावी आणि त्यावर तेलाने ग्रीसिंग करावे. ही प्लेट त्या मोठ्या टोपामध्ये ठेवावी. याकरीता पाण्यात तुम्हाला स्टीलची रिंग ठेवावी लागेल. जेणेकरून त्यावर ताट ठेवता येईल. पाण्याला उकळी येणे गरजेचं आहे.

  5. 5

    प्लेटमध्ये बॅटर ओतण्यापूर्वी त्यामध्ये सोडा टाकावा. बॅटर नीट ढवळावे. उकळत्या पाण्यामुळे ताट गरम झाल्यानंतर ताटामध्ये बॅटर ओतावे.

  6. 6

    आता खमण तयार होण्याकरीता १५ मिनिटे प्रतीक्षा करावी. तोपर्यंत टोपावर झाकण ठेवावे. टोपाखालील गॅस कमी करू नये.

  7. 7

    दुसरीकडे लिंबू पाणी तयार करून घ्यावे. यासाठी एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये लिंबू पिळावा आणि चार चमचे साखर टाकावी. लिंबू नसेल तर आपण लिंबू फुलाचाही वापर करू शकता. ढोकळ्याला आंबटगोड चव येण्याकरीता आपण लिंबू पाण्याचा वापर करणार आहोत.

  8. 8

    ढोकळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा पण टोपावरील झाकण पाच मिनिटांनंतर बाजूला करावे.

  9. 9

    आता दुसऱ्या कढईमध्ये फोडणीची तयार करावी. याकरीता तीन चमचे तेल कढईत घ्यावे. त्यानंतर तेलामध्ये एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हींग आणि कापलेल्या मिरचीची फोडणी द्यावी. मग त्यामध्ये तयार केलेले लिंबू पाणी मिक्स करावे. पाच मिनिटे हे पाणी गरम करत ठेवावे. पाण्याला उकळी येऊ द्यावी.

  10. 10

    आता प्लेटमध्ये खमण ढोकळा उलट करून घ्यावी. आपल्या आवडीनुसार ढोकळ्याचे काप करावेत.

  11. 11

    त्यानंतर वरून फोडणीचे पाणी सोडावे व कोथिंबिरीने सजावट करावी.
    तयार आहे गुजराती खमण ढोकळा रेसिपी... ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chandrika Nayee
Chandrika Nayee @nayeechandrika
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes