दाबेली (dabeli recipe in marathi)

रेसिपी सोबत घरच्या घरी *दाबेली मसाला* कसा बनवायचा याचेही साहित्य दिले आहे.
दाबेली (dabeli recipe in marathi)
रेसिपी सोबत घरच्या घरी *दाबेली मसाला* कसा बनवायचा याचेही साहित्य दिले आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दाबेली मसाला बनवण्यासाठी, मंद आचेवर एका पॅनमध्ये धणे, जीरे, लवंग, दालचीनी, काळीमिरी आणि बडीशेप एकत्र हलकेच भाजून घ्यावे.
भाजलेले साहित्य थंड झाल्यावर, मिक्सरमधे बारीक दळून घ्यावे. आता त्यात चाट मसाला आणि काश्मिरी लाल मिरची पावडर घालून पुन्हा एकदा मिक्सरमधे फिरवून घ्यावे.
हा झाला दाबेली मसाला तयार....!!
- 2
दाबेली स्टफिंग बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करुन, त्यात २ टेबलस्पून दाबेली मसाला २-३ मिनीटे मंद आचेवर खमंग परतून घ्यावा.
आता यामधे २-३ टेबलस्पून पाणी घालून पुन्हा परतून घ्यावे.वरील मसाल्यामधे स्मॅश केलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन गॅस बंद करावा.
- 3
आता एका पसरट प्लेटमधे तयार मिश्रण समान पसरुन ठेवावे
नंतर त्यावर १ चमचा तिखट शेंगदाणे, १ चमचा डाळींबाचे दाणे, थोडी कोथिंबीर गार्निश करुन मिश्रण थंड होऊ द्यावे.हे झाले तयार दाबेली चे स्टफिंग...!!
- 4
दाबेली स्टफिंग आणि इतर साहित्य घेऊन, आता दाबेली चे प्लेटींग तयार करण्यासाठी,
१. दाबेली बन /पाव ला मध्यभागी हाफ कट द्यावा.
२. आता बनच्या एका बाजूला हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला खजूर चटणी लावावी.
३. नंतर, चटणी लावलेल्या बनमध्ये दाबेली स्टफिंग, थोडा कांदा, थोडे तिखट शेंगदाणे व डाळींबाचे दाणे ठेऊन बन दाबून बंद करावा. - 5
वरीलप्रमाणे तयार झालेले बन्स, तव्यावर बटर गरम करुन दोन्ही बाजूंनी खमंग शेकून घ्यावे.
- 6
शेकलेले दाबेली बन्स चित्रात दाखवल्याप्रमाणे बारीक शेव मध्ये घोळवून त्यावर कोथिंबीर, कांदा गार्निश करुन.... दाबेली सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या