भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपल्या आवडीनुसार सगळ्या भाज्या धून घेणे. बारीक चिरून घेणे. हरभरा, मटार, पावते दाणे सोलून घेणे.
- 2
तीळ, शेंगदाणे भाजून घेणे.या दोन्ही बारीक करून घेणे. आता मिक्सर पोट मध्ये शेंगदाणे कुट, ओले खोबरे, तिळ कुट आणि आवडीनुसार सगळे मसाले घालून बारीक फिरवून घेणे. हा भाजीचा मसाला तयार झाला.
- 3
आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद घालून फोडणी करून घेणे. आता या मध्ये चिरून ठेवलेल्या भाज्या फोडणी मध्ये छान 3-4 मिनीट परतून घेणे. झाकण ठेवून वाफ काढून घेणे.
- 4
आता या मध्ये वाटून घेतलेला मसाला घालून छान हलवून घेणे. आता या मध्ये आपल्याला जितके पाणी हवे आहे त्या प्रमाणे घालावे. खूप ही भाजी पातळ करू नये. आता झाकण ठेवून मंद गॅसवर 5-7 मिनीट भाजी छान शिजवून घेणे. वरुण कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
- 5
मस्त अशी भोगी भाजी तयार झाली. गरम बाजरी भाकरी किंवा पोळी सोबत ही भाजी सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#मकर_संक्रांति_स्पेशल#भोगी_भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
-
-
-
-
-
भोगीची हेल्दी भाजी(शेंगसोला) (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या सणाला हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी बनवली जाते जिला शेंगसोला असे म्हटले जाते ही भाजी अतिशय चवदार बनते कारण यामध्ये तीळकुटाचा समावेश केला जातो. चला तर मग बनवण्यात भोगीची भाजी Supriya Devkar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9E-book विंटर स्पेशल रेसिपीजमकरसंक्रातिच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा भागात वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून "भोगीची भाजी" ज्याप्रमाणे बनविली जाते त्याप्रमाणे बनविली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल.🥰 Manisha Satish Dubal -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#विंटर रेसिपी चॅलेंज मकर संक्रांत स्पेशल विंटर रेसिपी चॅलेंज Week-9 कांदा व लसुन विरहित तयार केलेली भोगीची सात्विक भाजी Sushma pedgaonkar -
-
भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
# भोगीची मिक्स भाज्यांची भाजी म्हणजे तीला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात. हेल्दी ही आहे व टेस्टी आहे पाहु या कशी करतात ते ,,,,, Shobha Deshmukh -
#संक्रांती# भोगीची भाजी
भोगीची भाजी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे जी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनविली जाते . Vrushali Patil Gawand -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #हिवाळा_स्पेशल ...#भोगीची_भाजी...हिवाळ्यात 14 जानेवारीला येणारा संक्रांत सण आणी 1 दिवस आधी भोगी.... त्या दिवशी बहूतेक सर्वजण ही भोगी ची भाजी कींवा लेकुरवाळी भाजी म्हणून ही भाजी करतात ...या दिवसात मुबलक प्रमाणात मीळणार्या वेगवेगळ्या भाज्या टाकून ही भोगी ची भाजी करतात ....मटर ,गाजर ,सोले ,वांगे ,वाल, बोर ,ऊस मेथी ,पालक , कोथिंबीर ,ह्या भाज्या वापरून तीळ आणि शेंगदाणे कुट लावून ही सात्विक भाजी करतात ...आता आपल्याला ज्या भाज्या सहज मीळतील त्या वापरून आपण ही भाजी करावि ...तशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते .. Varsha Deshpande -
भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला संक्रात येते त्याच्या आदल्या दिवशी भोगी चा सण साजरा करतात या दिवशी मिक्स भाजी मिक्स भाज्या तिळकूट घालून बनवली जाते याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातात Smita Kiran Patil -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#भोगीचीभाजी'न खाई भोगी तो सदा राही रोगी'हे तुम्ही बऱ्याचदा ऐकले, वाचले असतीलचया हंगामात येणारे भाज्या ,धान्य आपण खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहू शकते.भोगी याचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोग घेणाराआनंद आपण पौष्टिक जेवणातून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला आपले आरोग्यदायी सुदृढ राहते.या हंगामात जवळपास भारतात सगळीकडेच ताज्या भाज्या ताज्या वातावरण तयार झालेल्या या हंगामात फळ, भाज्या ,धान्य आपल्याला बाजारातून मिळतात आणि आपण आपल्या रोजच्या आहारातून घेतल्या पाहिजे ज्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहील.मी ही भोगी निमित्ताने भोगीच्या स्पेशल भाज्याच्या बाजारात मिळतात त्या आणून भाजी तयार केले त्या तिळाचा वापर करून वाटण तयार केले खूप चविष्ट अशी ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते अशाप्रकारे भोगी साजरी केली जाते. Chetana Bhojak -
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook #भोगीची भाजी...#भोगी_धनुर्मास_धुंधुरमास🌅🌄☀️🙏 आज महाराष्ट्रात भोगी ..हा धनुर्मास किंवा धुंधुरमासाचा शेवटचा दिवस... सूर्य या महिन्यात धनु राशीत प्रवेश करतो म्हणून हा धनुर्मास..या महिन्याची आगळी वेगळी अशी न्यारी गंमत बरं का..🤩🤩 थंडीच्या या मोसमात सकाळच्या वेळा जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो..सणकून भूक लागते..मग काय करायचं ...तर पहाटेच स्वयंपाक करुन सूर्यदेवतेची पूजा करुन , सूर्याला अर्घ्य देवून नैवेद्य दाखवायचा..आणि पहाटेच सर्वांनी मिळून धुंधुरमास साजरा करत जेवायचे😍😋... ऋतु,हवामान,प्रकृती यांची अप्रतिम गुंफण करुन...आपले या दरम्यानचे खाद्यसंस्कारच वर्षभर शरीररुपी इंजिनाला इंधन पुरवतात.. म्हणूनच आयुर्वेदाने,आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाच्या हवामानानुसार , प्रत्येक ऋतू ,त्या ऋतूमधला आहार आणि त्या ऋतूमधील पिकणारे अन्नधान्ये,फळफळावळ,भाज्या यांचा त्रिवेणी संगम साधत त्यांचा संबंध त्या ऋतूंमध्ये साजर्या होणारा सणांशी लावत पर्यायाने देवाला दाखवण्यात येणार्या नैवेद्याशी जोडला आहे.. त्यामुळे नैवेद्याच्या निमित्ताने आपण ते पदार्थ करतो.आता आजचेच उदाहरण .आज भोगी..भोगीच्या निमित्ताने बाजरीची तीळ लावलेली भाकरी,लोणी,तूप,भोगीची मिक्स भाजी,गाजराची कोशिंबीर,मुगाची खिचडी,तिळाची चटणी साधारण असा नैवेद्य घरोघरी केला जातो..या थंडीच्या मोसमात या दिवसात पिकणाऱ्या अन्नधान्यामधून,भाज्यांमधून शरीराला उष्मांक ,तसेच इतर फायदे मिळावेत याचसाठी केलेली ही नैवेद्याच्या स्वरुपातील आहार योजना.. आयुर्वेदाचा अभ्यास करुन शरीरस्वास्थ्याचा खूप सखोल, बारकाईने विचार केलाय आपल्या पूर्वजांनी..🙏 fikr not.Eat Local."न खाई भोगी तो सदा रोगी".असं उगाच म्हटलं नाहीये..🙏 Bhagyashree Lele -
भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेसल_रेसिपीसमकरसंक्रांतीच्या आसपास शेतामधे अगदी लहान लहान कोवळ्या भाज्या यायला लागतात. लहान लेकरांसारख्या दिसणार्या कोवळ्या भाज्या खूप छान दिसतात. म्हणून या भाजीला लेकुरवाळी भाजी असं पण म्हणतात. लहान लहान वांगी, बटाटे, ओला वाटाणा, ओला हरभरा, पावटा, गुलाबी रंगाची गाजरं अशा अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या एकत्र शिजवून त्यात जरासे मीठ मसाले घालून केलेल्या भाजीची चव अगदी अफलातून लागते. आपल्या कडे उपलब्ध असलेल्या भाज्या घालून भोगीची भाजी करावी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. भाजी बनवायला पण जास्त वेळ लागत नाही, शिवाय कोवळ्या भाज्या असल्यामुळे पटकन शिजते. या भाजीची सविस्तर रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप देत आहे. Ujwala Rangnekar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9: ई बुक चेलेंज करिता मी भोगीची भाजी बनवली.हिवाळ्यात अशी पौष्टिक भाजी शक्ती वर्धक आहे. Varsha S M -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल#EB9भोगीची भाजी (लेकुरवाळी)जानेवारी हा संक्रांतीचा महिना. या दिवसात उपलब्ध असलेल्या भाज्यांची भाजी संक्रांतीच्या आधल्या दिवशी केल्या जाते तिला भोगीची भाजी म्ह॔टल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
भोगीची मिश्र भाजी
भोगी या सणाला महाराष्ट्र तसेच कर्नाटक मध्ये ही पौष्टिक भाजी बनवून देवाला भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आशा मानोजी -
सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#उंधियो Bhagyashree Lele -
More Recipes
टिप्पण्या (2)