छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम छोले धुवून 6-7 / overnight भिजवून घ्यावे. नंतर कुकर मध्ये पाणी घेऊन त्यात खडे मसाले, एका कापडात चहा पावडर घेऊन त्याची पुरचुंडी करावी व ती कुकर मध्ये घालावी. त्यात मीठ व छोले घालून 4-5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे.
- 2
एका वाट्यात गव्हाचे पीठ, मैदा घेऊन त्यात दही,मीठ, बेकिंग पावडर व तेल घालून पीठ भिजवून घ्यावे व 2 तास मुरू द्यावे.
- 3
ग्रेव्ही साठी एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात जीरे घालून कांद्याची प्युरी घालून गुलाबी होईपर्यंत परतावे नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी 2 मिनिटे परतून घ्यावे. टोमॅटो प्युरी घालावी व तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. हळद, तिखट, धणे पावडर, छोले मसाला घालून नीट परतून घ्यावे व शिजवलेले छोले घालावे.अनार दिना, मीठ,1 चमचा तूप घालून परत 2-3 शिट्ट्या काढाव्या.
- 4
पीठाचे गोळे करून घ्यावे व गोल किंवा लांबट आकाराचे भटूरे लाटून घ्यावे.तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे व त्यात भटूरे तळून घ्यावे. सर्व्हींग प्लेट मध्ये काढून कांदा, लिंबू व तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या