रवा स्लाईस केक (Rava slice cake recipe in marathi)

अयंगर बेकरीत मिळणारा रवा केक सारखा अतीशय मऊ आणि लूशलूशीत होतो.
रवा स्लाईस केक (Rava slice cake recipe in marathi)
अयंगर बेकरीत मिळणारा रवा केक सारखा अतीशय मऊ आणि लूशलूशीत होतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात दही घ्यावे. दही थंड नसावे.नंतर पिठी साखर घालून छान फेटून घ्यावे.तेल घालून परत फेटावे.नंतर रवा, मैदा घालून छान मिसळून घ्यावे.
- 2
तयार मिश्रणात दूध घालून परत छान मिसळून घ्यावे व हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवावे म्हणजे रवा छान फुलतो. ब्रेड टिनला आतून तूप लावून बटर पेपर ठेवावा किंवा मैदा डस्ट करून टिन तयार ठेवावा.
- 3
२० मिनिटा नंतर व्हॅानिला ईसेन्स,बेकिंग पावडर व सोडा घालूनमिश्रण छान मिसळून घ्यावे. घट्ट वाटले तर १-२ टि.स्पुन दूध घालावे. आोव्हन १८० डिग्री वर १० मिनिटे प्रि.हिट करून घ्यावे
- 4
आता मिश्रण लगेच केक (ब्रेड टिन) मध्ये पसरावे व २-३ वेळा ट्याप करावे. वरून काजू-बदाम काप घालावे. व प्रि.हिटेड आोव्हन मध्ये बेक करावे.२०-२५ मिनिटात केक तयार होतो.चविष्ट आणि मऊसूत.
- 5
थंड झाल्यावर स्लाईस कराव्यात
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या (2)