शेवगा-वांग्याची भाजी (Shevga Vangyachi Bhaji Recipe In Marathi)

#BKR
शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला "चमत्कारी वृक्ष" असे म्हटलेले आहे.
शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स असतात.शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी नेहमी आहारात असावी.कढी,आमटी,भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात.
आज हा बहुगुणी शेवगा घालून वांग्याची टेस्टी भाजी केली आहे.बघा...आवडतेय का?😊

कुकिंग सूचना
- 1
शेवगा व वांगी धुवून चिरावीत.शेवग्याची सालं थोडी काढून टाकावीत.म्हणजे चव आतपर्यंत जाते.वांग्याच्या चौकोनी फोडी कराव्यात.वांगी पाण्यात घालून ठेवावीत.म्हणजे राप जातो.भाजीला लागणाऱ्या सर्व घटकपदार्थांची पूर्वतयारी करुन घ्यावी.
- 2
छोटा भाजीचा कुकर तापवून त्यात तेल घालावे.तेल तापले की मोहरी,मेथ्या,हळद,हिंग, कढीपत्ता घालून चुरचुरीत फोडणी करावी.प्रथम शेवग्याच्या शेंगा घालून 2मिनिटे परतावे.
- 3
त्यानंतर वांग्याच्या फोडी घालाव्यात. पुन्हा भाजी हलवावी.त्यावर कांदा-लसूण मसाला, तिखट,गोडा मसाला, मीठ घालावे.
- 4
दाण्याचे कूट व गूळ घालून भाजी हलवावी.2छोट्या वाट्या पाणी घालावे.कुकरचे झाकण बंद करुन बारीक गँसवर 5मिनिटे ठेवावे.प्रेशर धरले की 1शिट्टी करावी.यामुळे शेवगा व वांगी प्रमाणात शिजतात.
- 5
कुकर गार झाला की झाकण काढून भाजी सारखी करुन घ्यावी.व सर्व्हींग बाऊलमध्ये काढून ओले खोबरे व कोथिंबीर यांची सजावट करुन गरम भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या