दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#BKR
दोडका,दुधीभोपळा....यासारख्या भाज्या खूप जणांना आवडत नाहीत.तरीही कसंही करुन त्या खायला घालण्याचं कसब गृहिणीचं!...आणि त्या खायला लावल्याचा आनंदही औरच!😉दोडक्याची भाजीही कशीही केली तरी फारशी आवडतच नाही.एकतर याच्या शीरा किसून काढल्यावर तो उरतो कमी,पाणीही आपोआप सुटते त्यामुळे ही भाजी खायला सगळेच कुरकुतात.माझ्या मावस सासूबाईंनी मला शिकवलेली ही भाजी आहे.त्यांनी दोडक्याच्या शीरा काढून तुकडे करून,हे तुकडे पाट्यावर ठेचले,मागोमाग बटाट्याची साले काढून तोही ठेचला,मिरच्या ठेचल्या...आणि काही नाही...साधी फोडणी करुन त्यात हे सगळे घातले मीठ घातले व भाजी कम ठेचा वाफवला.थोडीशी कोथिंबीर व लिंबू पिळले....चटकदार दोडक्याची भाजी तयार!...तसंच चवीला वेगळी,चटपटीत म्हणून सगळ्यांना आवडली.तेव्हापासून बहुतेक वेळा अशीच भाजी आमच्याकडे होते.सगळ्यांनाच आवडते.आता माझ्याकडे पाटा नाही,त्यामुळे चॉपरमधून दोडका आणि बटाटा,मिरच्या काढल्या.साधारण तोच फील भाजीला आलाय😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2व्यक्ती
  1. 1/8कि.(आतपाव)दोडका
  2. 1बटाटा
  3. 3 टेबलस्पूनगोडंतेल फोडणीसाठी
  4. 2मोठ्या हिरव्या मिरच्या
  5. 5-6कढीपत्ता पानं
  6. 1/4 टीस्पूनमोहरी, हिंग,हळद फोडणीत
  7. 1 टेबलस्पूनदाण्याचे कूट
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/4फोड लिंबाची
  10. 1/4 इंचआलं

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    दोडक्याच्या शीरा व बटाट्याची सालं काढून घ्यावीत.दोडका,बटाटा व मिरच्या,आलं चॉपरमधून बारीक करून घ्यावेत.दाण्याचे कूट,मीठ,कढीपत्ता,तेल व फोडणीचे साहित्य घ्यावे.

  2. 2
  3. 3

    तापलेल्या कढईत थोड्या जास्त तेलावर मोहरी,हळद,हिंग, कढीपत्ता याची फोडणी करावी.बटाटा व मिरच्या परतून घ्याव्यात. त्यानंतर बारीक केलेला दोडका घालावा.छान परतावे.दाण्याचे कूट,मीठ घालावे.1/4लिंबाची फोड पिळून घालावी.

  4. 4

    भाजीवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.7-8मिनिटात भाजी शिजते. चवीला चटपटीत आणि सगळ्यांना आवडेल असा हा भाजीचा ठेचा पोळी,भाकरीबरोबर छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes