बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#BKR
चतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली.

बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)

#BKR
चतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४जणांसाठी
  1. 1/2 किलोउकडलेले बटाटे
  2. 4हीरव्या मिरच्या
  3. 10-12कढीपत्त्याची पाने
  4. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 3 टे. स्पून तेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनहींग
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतल्या, मिरच्या बारीक चिरून घेतल्या.

  2. 2

    नंतर एका कढईत तेल तापवून घेतले व त्यांत अनुक्रमे मोहरी, मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हींग व हळद घातली.

  3. 3

    नंतर त्यांत बटाट्याच्या फोडी घातल्या व मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले व झाकण देऊन ५ मिनिटे वाफ काढली..

  4. 4

    नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व गरमागरम सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes