पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)

#SDR
#समर_डिनर_रेसिपी
#पावभाजी
उन्हाळ्याच्या दिवसात साग्रसंगीत जेवण बनवताना उकाड्यामुळे जीव हैराण होतो. ओट्यासमोर बराच वेळ उभं राहून खूप काही पदार्थ बनवून घामाघूम होऊन ते जेवायला सुद्धा जात नाही. मग अशावेळी झटपट बनवता येईल अशी चटपटीत पावभाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पोटभरीची पण असते. म्हणून पटकन आणि बनवायला एकदम सोपी अशी चटकदार पावभाजीची रेसिपी देत आहे.

कुकिंग सूचना
- 1
फ्लॉवर, बटाटे धुवून त्याचे मोठे तुकडे करून त्यात थोडे पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा आणि मिक्सर मधून टोमॅटोची प्युरी करून घ्यावी. तोपर्यंत भाज्याही शिजतात.
- 2
कढईत तेल आणि बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून त्यावर तिखट पूड, हळद, थोडा पावभजी मसाला आणि मीठ घालून परतावे मग त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परतावे.
- 3
परतलेल्या कांद्याच्या मिश्रणावर टोमॅटो प्युरी घालून छान तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात उकडलेला फ्लावर आणि बटाट्याची स्मॅशर ने पेस्ट करून ती कांद्यावर घालावी.
- 4
भाजीला चांगली उकळी आली की मग त्यात पुन्हा थोडा पावभाजी मसाला आणि बटर घालून मिक्स करावे.
- 5
तव्यावर बटर मधे पाव फ्राय करावे. एका प्लेटमधे गरमागरम पावभाजीवर बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फ्राय केलेले पाव आणि सोबत बारीक चिरलेल्या कांदा, लिंबू ठेवून पावभाजी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चटपटी भेंडी ची भाजी (Bhendi chi Bhaji Recipe In Marathi)
- इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
- बटरस्कॉच लस्सी (Butterscotch Lassi Recipe In Marathi)
- ओनियन टोमॅटो उत्तपम (Onion Tomato Uttapam Recipe In Marathi)
- मुग डाळ आणि चना डाळ वडया /सांडगे (Moong Dal Chana Dal Sandge Recipe In Marathi)

टिप्पण्या (2)