लबाबदार पनीर मसाला (Paneer Lababdar Masala Recipe In Marathi)

#ग्रेव्ही/रस्सा भाजी
लबाबदार पनीर मसाला (Paneer Lababdar Masala Recipe In Marathi)
#ग्रेव्ही/रस्सा भाजी
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो ग्रेव्हीसाठी:
कढईत तेल गरम करून त्यात संपूर्ण मसाला घालून एक मिनिट परतून घ्या.
कांदे, हिरवी मिरची, आले आणि लसूण पाकळ्या घालून कांदे हलके तपकिरी होईपर्यंत शिजवा. काजू, खरबूज बिया, टोमॅटो, काश्मिरी लाल मिरची आणि चवीनुसार मीठ घालून ४-५ मिनिटे शिजवा आणि पाणी घालून झाकून ठेवा आणि ८-१० मिनिटे शिजवा.
मिश्रण थंड करून बारीक वाटून घ्या. - 2
पनीर लबाबदार बनवण्यासाठी:
कढईत तेल आणि बटर गरम करा, आले घालून एक मिनिट परतून घ्या, तयार टोमॅटो कांदा ग्रेव्ही घाला.
ग्रेव्ही जेवढी पातळ हवी तेवढी पाणी घाला, झाकून ७-८ मिनिटे शिजवा.
नंतर पनीरच्या चौकोनी तुकड्यांसह किसलेले पनीर घाला. नाजूक पनीरचे चौकोनी तुकडे न कुस्करता चांगले मिसळा आणि ३-४ मिनिटे शिजवा.
त्यावर गरम मसाला, कसुरी मेथी, ताजी मलई, मीठ आणि ताजी कोथिंबीर घालून मिक्स करून गरमागरम रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या