आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)

#ASR
कापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीगूळ
  2. 1 वाटीगव्हाचे पीठ
  3. 2 चमचेबेसन पीठ
  4. 1 चमचाखसखस
  5. दोन चमचे मोहन घालण्यासा तेल
  6. तळण्यासाठी तेल
  7. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य एकत्र करून घ्यावे

  2. 2

    गूळ घेऊन त्यात थोडे पाणी घालून घ्यावे व गॅसवर ठेवावे गुळ वितळेपर्यंत ठेवावे नंतर गॅस बंद करावा नंतर हे पाणी गाळून घ्यावे

  3. 3

    आता एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीत गव्हाचे पीठ घ्यावे त्यात मोहन घालावे पीठ सर्व एकत्र मळून घ्यावे नंतर त्यात गाळलेल्या गुळाचे पाणी थोडे थोडे घालून पिठाचा गोळा मळून घ्यावा

  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटं गोळा झाकून ठेवावा नंतर परत मळून घ्यावा

  5. 5

    पोळपाटावर एक गोळा घेऊन पोळी लाटून घ्यावी लाटल्यानंतर त्यावरसगळीकडे खसखस घालून घ्यावी व परत एकदा लाटणे फिरवावे म्हणजे खसखस सगळीकडे दबते व चांगले लागते त्याचा चौकोन भाग करून घ्यावा व नंतर त्याचे शंकरपाळ्यासारखे काप कापून घ्यावे

  6. 6

    गॅसवर कढई घेऊन त्यात तेल घालावे व सर्व कापण्या खरपूस तळून घ्याव्या

  7. 7

    छान खरपूस खुसखुशीत गुळाच्या कापण्या तयार थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्या बरेच दिवस टिकतात

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes