चमचमीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पान स्वच्छ धुवून पुसून घेतली व लाटण्याने त्याच्या शिरा मोडून घेतल्या. नंतर त्यावर चिंचेचा रस लावला.
- 2
एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, संडे मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, धणे जीरे पावडर, चिंचेचा कोळ, गूळ,मीठ ह्यामधे पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट बनवून घेतली.
- 3
एका पानाला ही पेस्ट लावून त्यावर उलट्या बाजूने दुसरे पान त्यावर पेस्ट अशारितीने आठ पाने लावून नंतर दोन बाजूने पाने दुमडून त्याची गुंडाळी करून घेतली.
- 4
नंतर हे तयार झालेले उंडे कुकरमधे दोन शिट्ट्या काढून वाफवून घेतले.
- 5
थंड झाल्यावर सुरीने छान वड्या कापून घेतल्या व तव्यावर तेल सोडून दोनही बाजूने छान कुरकुरीत शॅलो फ्राय केल्या व खमंग कुरकुरीत अळू वड्या सगळ्यांना खाऊ घातल्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16473393















टिप्पण्या