खुसखुशीत चिरोटे (Chirote Recipe In Marathi)

#ChooseToCook.
World food day.
चिरोटे हा प्रकार पारंपारिक आहे. सहसा दिवाळीत करतात. अतिशय खुसखुशीत, देखणा ,फुलांसारखा दिसतो व चवीलाही तेवढाच सुरेख, हरवाळ लागतो. पाहूयात काय साहित्य लागते.....
खुसखुशीत चिरोटे (Chirote Recipe In Marathi)
#ChooseToCook.
World food day.
चिरोटे हा प्रकार पारंपारिक आहे. सहसा दिवाळीत करतात. अतिशय खुसखुशीत, देखणा ,फुलांसारखा दिसतो व चवीलाही तेवढाच सुरेख, हरवाळ लागतो. पाहूयात काय साहित्य लागते.....
कुकिंग सूचना
- 1
मैद्यात मीठ व दुध टाकून एक तास घट्ट भिजवून ठेवा.
- 2
नंतर मिक्सरच्या भांड्यात मैद्याचे बारीक बारीक तुकडे करून फिरवून घ्या किंवा कुटून घ्या. म्हणजे पीठ एकदम हलके होते. एका बाऊलमध्ये तूप घ्या व त्यात दोन टीस्पून कॉर्नफ्लोअर टाका. हे मिश्रण पोळ्यांवर लावण्यासाठी तयार केले.
- 3
कणकेचे गोळे करून घ्या एकेक गोळा घेऊन तांदळाची पिठी लावून पातळ लाटून घ्या. नंतर तिन्ही पोळ्यांवर कॉर्नफ्लोर व तुपाचे तयार केलेले मिश्रण पोळ्यांना लावा. एकावर एक असे तीन पोळ्यांना लावून त्याची गुंडाळी करा.
- 4
नंतर त्याचा रोल करून छोटे तुकडे करा. हलक्या हाताने लाटून घ्या. गॅसवर एका कढईत तेल किंवा तूप टाका मंद गॅसवर एक एक चिरोटा सोडून अलगदपणे तळून काढा. त्याचे अत्यंत सुरेख पदर सुटतात.
- 5
तळून काढलेल्या चिरोट्यांवर वेलदोडा व पिठीसाखर मिक्स पावडर भुरभुरा किंवा साखरेचा पाक करून त्यात तीन-चार मिनिटे ठेवून बाहेर काढा. अशा रीतीने चिरोटे फुलांसारखे दिसतात व खाण्यास अत्यंत खुसखुशीत yummy लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या (4)