कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)

#VNR
विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते.
कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)
#VNR
विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोलंबीला हळद आणि चिंचेची पेस्ट लावून दहा ते पंधरा मिनिटं मिनिटे मॅरीनेट करून घ्यावे.
- 2
मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या, आलं, ओला नारळ, धने, आणि टोमॅटो घेऊन मिक्सरला त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी.
- 3
कढईमध्ये तेल गरम करून त्यात उरलेला लसूण, कढीपत्त्याची पाने आणि कांदा घालून परतून घ्यावे.
- 4
कांदा परतून झाला की त्यामध्ये तयार वाटण घालावे. नंतर त्यात सर्व मसाले व मीठ घालावे. मसाले व मीठ वाटणामध्ये चांगले परतून घ्यावे.
- 5
वाटण परतून झाले की त्यामध्ये पाणी घालावे. कालवणाला उकळी काढून घ्यावी.
- 6
कालवणाला उकळी आली की त्यामध्ये मॅरीनेट केलेली कोलंबी घालावी. झाकण लावून त्यावर पाणी ठेवावे. आणि मध्यम आचेवर कालवणाला पाच ते सात मिनिटं शिजू द्यावे.
- 7
कोलंबी शिजली की त्यामध्ये वरतून चिरलेली कोथिंबीर घालावी. पुन्हा झाकण काढून कालवणाला तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यावे. गरमागरम कोलंबीचे कालवण भात, भाकरी,किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या (2)