टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)

#ZCR
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जा
चला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची.
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCR
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जा
चला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची.
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 सिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेतले.
- 2
थंड झाल्यावर त्याची साले काढून गर काढून घेतला आणि चाळणीने चाळून घेतला. (चाळणीने चाळून घेतल्याने बिया बाहेर निघून जातात).
- 3
आता कढईत बटर गरम करून त्यात अद्रक लसुण पेस्ट, जीरे पूड, मिरी पुड घालून परतून घेतले. त्यात टोमॅटो चा गर, साखर आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी घालून 1 उकळी येऊ दिली. आता त्यात कॉर्नफ्लॉवर पाण्यात भिजवून थोडे थोडे टाकून मिक्स करून घेतले. आणि 2 उकळ्या फुटू दिल्या. आपले टोमॅटो सूप तयार आहे.
- 4
सर्वात शेवटी वाटी किंवा कपात टोमॅटो सूप, ब्रेड चे तुकडे घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या