खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)

बाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू ..

कुकिंग सूचना
- 1
बाजरी, तांदुळ व गहू ही तिन्ही पिठं, छान मिक्स करा.
गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल तापवा, हिंग, मोहरी, जीरे टाकून खमंग फोडणी करा. त्यांत हळद, तिखट, धने जिरेपूड व मीठ टाकून, त्यांत पाणी ओता. - 2
पाण्याला आधण आल्यावर, गॅसफ्लेम बरीक करून, त्यांत बाजरी, तांदूळ, गहू पिठाचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित कालवा. गुठळी होऊ देऊ नका. कढईवर झाकण झाकून, 2 - 4 मिनिटे पिठाला छान वाफ येऊ द्या.
एका ताटाला तेलाचे ग्रीसिंग करा. 2 -4 मिनिटांनी झाकण उघडून, शिजलेले पिठ चांगले मिक्स करा. - 3
शिजलेल्या पिठाचा गोळा, तेल लावलेल्या ताटात ओता. वाटीला तेल लावून एकसारखे छान थापून घ्या. 2 मिनिटांनी त्याच्या सुरीने वड्या कापा. थोड्याशा गार झाल्या कीं उलथन्याने हलक्या हाताने काढून, वड्या प्लेटमध्ये ठेवा.
- 4
प्लेट मधल्या वड्यांवर खोबरे कीस व बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. खमंग व पौष्टिक बाजरी वड्यांची लज्जत चाखा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या