मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#HV
हिवाळा स्पेशल रेसीपी

#हिरवे मूग
#मोड आलेले मूग
#मूग
#सालीचे मूग

मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)

#HV
हिवाळा स्पेशल रेसीपी

#हिरवे मूग
#मोड आलेले मूग
#मूग
#सालीचे मूग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमहिरवे मोड आलेले मूग
  2. 1मोठा कांदा चिरुन
  3. 4 ते 5 लसुण पाकळ्या
  4. 7 ते 8 कढीपत्ता पाने
  5. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनगरम गरम मसाला
  7. 1 टीस्पूनधणे पावडर
  8. 1 टीस्पूनगूळ पावडर
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. 1/2हळद
  12. 1/4हिंग
  13. पाणी आवश्यक ते नुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कांदा, लसुण बारीक चिरून घ्या. कुकर मधे तेल घालून घ्या. ते तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता पाने घालुन घ्या. नंतर त्यात कांदा, लसूण घालून चांगले परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात मोड आलेले हिरवे मूग घाला. व 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्या. आता त्यात मीठ चवीनुसार, गूळ, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर घालून घ्या. त्यात थोडेसे पाणी घाला. व झाकण लावून घ्या. कुकर ची शिट्टी होईल असे वाटले की गॅस बारीक करा. व नंतर 5 मिनिटांनी बंद करून घ्या. मोड आलेल्या मुगाची उसळ शिजून तयार आहे.

  3. 3

    तयार उसळ सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes