वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

#हिवाळा स्पेशल
हिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त ताज्या ताज्या भाज्या येतात. आज अशीच बाजारात भरीताची वांगी दिसली. मस्त बेत झाला, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी....
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#हिवाळा स्पेशल
हिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त ताज्या ताज्या भाज्या येतात. आज अशीच बाजारात भरीताची वांगी दिसली. मस्त बेत झाला, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग्यांना तीन चार उभ्या चिरा द्या आणि कीड असेल तर चेक करा. त्या चिरात लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या भरा व वरून वांग्याला तेल लावून गॅसवर खरपूस भाजून घ्या. त्यावरच टोमॅटो सुद्धा भाजून घ्या.
भाजून झाल्यावर ताटात काढून थंड होऊ द्या. - 2
पॅनवर तेल घालून त्यात जीरे, हिंग, कांदा, आलं लसूण पेस्ट, भाजलेल्या टोमॅटोची साल काढून तो चिरून घाला. कांदा चांगला भाजला की त्यात हळद, धनेजिरे पावडर, मीठ घाला.
- 3
भाजलेल्या वांग्याची साल काढून घ्या कापून आतल्या बिया काढून टाका. आता स्मॅशरने स्मॅश करून पॅनमध्ये घाला. कांद्याची पात चिरून घाला. शेंगदाण्याचे कूट घाला. परतून झाकण ठेवून छान एक वाफ काढा.कोथिंबीर घालून गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करा वांग्याचे भरीत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
- कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
- झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मसाला पान / विड्याच पान / विडा (Vidyache Paan Recipe In Marathi)
- मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)








टिप्पण्या