चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)

#PR
कोणत्याही पार्टीला नॉनव्हेजिटेरिअन लोकांसाठी "चटपटा एग बाईट " ही रेसिपी आपण करू शकतो. अतिशय सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे.
चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)
#PR
कोणत्याही पार्टीला नॉनव्हेजिटेरिअन लोकांसाठी "चटपटा एग बाईट " ही रेसिपी आपण करू शकतो. अतिशय सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावे, आले, लसूण, मिरची बारीक करून घ्यावे.
- 2
अंडी फेटुन घ्यावीत. त्यानंतर बेसन चिरलेले सर्व साहित्य, गरम मसाला पावडर, तिखट, मीठ, दोन चमचे पाणी सर्व एकजीव मिक्स करावे. त्यानंतर त्यात फेटलेली अंडी मिक्स करून मिश्रण चांगले मिक्स करावे
- 3
गॅसवर आप्पम पात्र गरम करायला ठेवावे.आप्पम पात्राच्या प्रत्येक गोलात तेल व थोडे चिरलेला कांदा, टोमॅटो घालून त्यात चमचाभर मिश्रण घालावे, मिश्रण घातल्यावर बाजूने तेल सोडावे. त्यानंतर झाकण झाकून वाफ येऊ द्यावी.
- 4
एग आप्पे वाफवलेले खात्री करून उलटावेत. तेल घालून दोन्ही बाजूने शेकून घ्यावेत. तयार चटपटीत एग बाईट छान लागतात. हे "चटपटा एग बाईट" सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या