पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)

#LCM1
शक्यतो थंडीच्या दिवसात पावटा, घेवडा,ओला हरभऱ्याचा सीजन असतो. त्यामुळे या दिवसात आमच्याकडे पावट्याचा, हरभऱ्याचा मसाले भात एकदातरी बनविला जातोच. 😋 तर बघूया "पावट्याचा मसाले भात" रेसिपी 🥰

कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावा. फोडणीसाठी कांदा व टोमॅटो चिरून घ्यावा. बटाट्याच्या फोडी करून घ्याव्यात. आले, मिरची, लसूण व गरम मसाला पावडर एकत्रित पेस्ट करून घ्यावी.
- 2
गॅसवर पातेल्यात तेल गरम करून तमालपत्र, मिरच्याची फोडणी करावी. त्यावर कांदा, टोमॅटो परतन मऊ झाला की, पावटा, बटाटे परतावेत, दही, हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून परतावे व झाकण झाकून एक वाफ आणावी.
- 3
त्यानंतर तांदूळ घालून परतावेत, लिंबूचा रस घालावा, व तांदळाच्या अडीच पट गरम पाणी घालून भात शिजू द्यावा.
- 4
भाताबरोबर पाणी आले की, पातेल्यावर झाकण झाकावे. दहा मिनिटांनी भात, पावटा शिजल्याची खात्री करून, गॅस बंद करावा
- 5
गरमागरम "पावटे मसाले भातावर" साजूक तूप घालून, पापड, लोणचे, बरोबर सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या