कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण हरभरा सोलून स्वच्छ धुवून पुसून भाजून घ्यावे
- 2
मग सर्व साहित्य काढून घ्यावे मग कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे
- 3
मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण पाकळ्या, खोबरे चे तुकडे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 4
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी कढीपत्त्याची पाने घालून फोडणी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परतावे.
- 5
कांदा टोमॅटो परतून झाल्यावर त्यात बारीक केलेला मसाला घालून परतून घ्यावे मग त्यात हरभरे घालून थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यावे.
- 6
आपली ओल्या हरभऱ्याची उसळ तयार आहे एक वाटी मध्ये काढून गरम गरम भाकरी, चपाती, किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16773616










टिप्पण्या (3)