गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व २ टे. स्पून तेल घालून कणिक मळून घेतली व २ टे. स्पून तेलाने छान मऊ करून घेतली.
- 2
तीळ, खोबर, खसखस, शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले. नंतर सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेतले. नंतर एका भांड्यात तूप तापवून त्यांत बेसन भाजून घेतले.
- 3
एका किसणीने गूळ किसून घेतला व त्यांत तीळ, खोबर, खसखस, शेंगदाण्याची तयार केलेली पीठी, बेसन, तूप, वेलची पूड व जायफळ पूड घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. गुळपोळीचे पुरण तयार झाले.
हे तयार पुरण फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकते व मनांत येईल तेव्हा गुळपोळीचा स्वाद घेता येतो. - 4
नंतर तयार पीठाचा छोटा गोळा घेऊन त्याचा पुरी एवढा आकार लाटून त्यांत तयार पुरण भरले व कडा बंद करून पुरणपोळी सारखा ऊंडा करून घेतला व पोळी लाटली.
- 5
नंतर तव्यावर तूप सोडून पोळी दोनही बाजूने खमंग भाजून घेतली. गरमागरम गुळपोळी खाण्यासाठी तयार झाली. ह्या तयार पोळ्या चार दिवस छान राहू शकतात आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या