कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)

#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न.....
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हलवा फिश चे तुकडे कापून स्वच्छ धुवून घ्या.
- 2
नंतर फिश ला उग्र वास येऊ नये म्हणून लिंबू किंवा कोकमाचे आगळ लावून १० मिनिटे ठेऊन द्या.
- 3
आता दुसऱ्या बाजूला मिक्सरला ३-४ हिरव्या मिरच्या, ८-९ लसूण पाकळ्या, जीरे, आले, कोथिंबीर, धणे ह्यांचे वाटप करून घ्या. नंतर फिश मधील पाणी काढून एका पसरट ताटात घेऊन फिश ला पुन्हा एकदा लिंबू चोळून घ्या.
- 4
नंतर त्यावर हळद, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या चे वाटप, फिश मसाला, चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकजीव करून प्रत्येक फिशला तो मसाला घोळवून घ्या.
- 5
आता एका पसरट ताटात रवा, तांदळाचे पीठ थोडे लाल तिखट हळद मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करा... आणि त्यात एक एक फिश चा तुकडा चारही बाजूंनी घोळवून.. बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल चांगले गरम करून त्यात(घोळवून ठेवलेली फिश) एक एक करून तेलात सोडा. आणि दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत फाय करा....
- 6
तयार गरमागरम हलवा फिश फ़्राय... वरून लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी सोबत सव्हऀ करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या (2)