फ्रोझन मटार (Frozen Matar Recipe In Marathi)

#MR: आत्ता भाजी मार्केट ला मटार फार स्वस्त आणि चांगला मिळत आहे तर जास्त मटार घेऊन त्याचा साठा कसा करायचा जेणे करून आपण वर्ष भर हिरवागार ताजा मटार हवेल तसा आणि हवेल तेवढा घेऊन मटार पासून जे काही पदार्थ ( मटार भाजी, पाव भाजी,कटलेट आणि इतर काही पदार्थ) बनवू शकतो. म चला बघुया मटार कसा फ्रीज मध्ये फ्रोझन करायचा. मीठ आणि साखर मुळे वाटाणा हिरवा आणि वर्ष भर ताजा राहतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटार शेंगा सोलून मटार दाणे स्वच्छ धुऊन घ्यावे.
- 2
आता एका टोपात पाणी घालून गॅस वर उकलत ठेवावे (अंदाजे मटार बुडेल तितके पाणी घालावे).
- 3
पाणी उकळले की त्यात मीठ आणि साखर घालावी आणि पाणी उकळून घ्यावे नंतर त्यात मटार घालावें आणि हलवून मटार तीन ते चार मिंट उकळून घ्यावे आणि गॅस बंद करून मटार एका चाळणीने गाळून घ्यावे. नंतर मटार थंड करून झिप लोक वाली प्लास्टिक बेग मध्ये भरून फ्रीझर मध्ये ठेवावे.(जर पाव किलो पेक्षा जास्त मटार असेल तर छोट्या छोट्या प्लास्टिक बेग मध्ये भरून ठेवावे महनजे हवे तसे आणि तितके मटार घेउ शकतो) जेव्हा मटार उपयोगाला घ्यायचे असेल तेव्हा एक किंव्हा अर्धा तास आगोदर मटार ची एक बेग फ्रीझर महधुन बाहेर काढून ठेवावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)