साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

#BR2 ...
घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले..
साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2 ...
घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले..
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची चिरून घ्यावी. गाजर किसून घ्यावे.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यात जीरे, मोहरी, हिरवी मिरची टाकावी.
- 3
हिरवी मिरची किंचित परतून घेतल्यानंतर कांदा टाकावा. एक मिनिट कांदा परतून घेतल्यानंतर त्यात मटार आणि गाजराचा कीस टाकावा आणि दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.
- 4
त्यानंतर त्यात हळद, तिखट टाकून मिक्स करून घ्यावे. आता त्यात टोमॅटो टाकावे.
- 5
दोन मिनिट टोमॅटो शिजवल्यानंतर त्यामध्ये अंडे फोडून टाकावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
- 6
चवीनुसार मीठ टाकावे. लिंबू पिळून घ्यावे. आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे.
- 7
आता या भुर्जीला थोडे कोरडे करून घ्यावे. मंद आचेवर आणि त्यात कोथिंबीर टाकावी. गॅस बंद केला की झटपट साधी सोपी अंडा भुर्जी तयार जेवणासाठी...
Similar Recipes
More Recipes
- झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
- "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
- पौष्टिक रवा- मटार सॅंडविच (Rava Matar Sandwich Recipe In Marathi)
- "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)






















टिप्पण्या (3)