'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)

लता धानापुने @lata22
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"
चवीला अतिशय खमंग लागते..
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"
चवीला अतिशय खमंग लागते..
कुकिंग सूचना
- 1
परातीत ज्वारीचे पीठ, बेसन पीठ घेऊन त्यात मिरची लसूण आले ठेचा, हळद, हिंग, लाल तिखट मीठ घालून मिक्स करा.. बारीक कापून कांदा, मेथी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- 2
लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्या.. स्वच्छ पांढरा रुमाल ओला करून पोळी पाटावर घाला. पीठाचा चपाती भाकरी ला घेतो तेवढा गोळा रुमालावर ठेवून थालिपीठ थापून घ्या..त्यावर थोडे तीळ भुरभुरावे..व दाबून घ्यावे.. तवा तापत ठेवा. तव्यावर थोडे तेल घालून पसरवून घ्या. थालिपीठ घालून कडेने थोडे तेल सोडावे.. गॅस मिडीयम टू लो असावा.. झाकण ठेवून एक मिनिट ठेवा
- 3
नंतर पलटी करून घ्या.. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या..व दही,साॅस, चटणी सोबत सर्व्ह करा..
- 4
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16810400














टिप्पण्या