झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी (Kharda Tadka Dal Amti Recipe In Marathi)

#TR
#तडका_रेसिपीस
#झणझणीत_खर्डा_तडका_डाळ_आमटी
आमच्या कुलदेवतेच्या रथोत्सवाला आम्ही गोव्याला मंगेशी येथे गेलो होतो. तेथील जत्रेत फिरताना मला दगडी खलबत्ता दिसला. बरेच दिवस घ्यायचा विचार करत होते. आणि अचानक या खलबत्त्याकडे लक्ष गेलं. मिक्सर मधून खर्डा बनवला तरी खलबत्त्यात कुटून बनवलेल्या खर्ड्याची चव एकदम मस्तच असते. तोंडाला चव आणाणारा खर्डा बनवण्यासाठी मी नवीन दगडी खलबत्ता घेतला. आणि लगेच घरी आल्यावर खलबत्त्यात खर्डा बनवून खमंग अशी मस्त झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी बनवली. एकदम मस्तच चविष्ट लागली. झटपट बनवता येते. याची रेसिपी पुढे देत आहे.

कुकिंग सूचना
- 1
खर्डा बनवण्यासाठी खलबत्त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं मीठ घालून ठेचून खर्डा बनवला.
- 2
शिजवलेली तूर डाळ चांगली घोटून घेतली. कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला.
- 3
फोडणीच्या लहान कढईमध्ये तेल घालून गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून तडतडल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतले त्यावर हळद आणि हिंग घालून मिक्स करून मग त्यात खलबत्त्यात ठेवलेला खर्डा घालून चांगले परतून घेतले.
- 4
शिजवलेल्या डाळीमध्ये परतलेल्या खर्ड्याचा तडका घालून मिक्स केले आणि छान उकळी काढून खरडा आमटी शिजवून घेतली, आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.
"झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी" खायला एकदम मस्तच चविष्ट लागली.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या