लसुणी मेथी
झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम २ टेबल स्पून तेलात लसूण ठेचून घालून मग मेथीची पाने व मीठ घालून शिजवा. शिजल्यानंतर बाजूला काढून ठेवा
- 2
मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, डाळे, तीळ व ४ टीस्पून पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
- 3
कढईत ४ टेबल स्पून तेलात २५ लसूण पाकळ्या चिरून घाला, त्या लालसर झाल्या की लाल मिरची, चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात हळद, तिखट, धनेपूड घालून शिजवा थोडं पाणी घाला. नंतर वरील पेस्ट व थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत ५ मिनिटे शिजवा. नंतर मीठ बेताचच घाला, (कारण मेथी शिजवताना आपण मीठ घातलं आहे). शीजवलेली मेथी, गरम मसाला घाला.
- 4
तयार आहे लसुणी मेथी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17299207











टिप्पण्या