अप साईड डाऊन संत्रा केक

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक.....

अप साईड डाऊन संत्रा केक

पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटं
४ जण
  1. १ टेबल स्पून बटर
  2. २ टेबल स्पून साखर
  3. १ कप मैदा
  4. १ टीस्पून बेकिंग पावडर
  5. १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  6. चिमूटभर मीठ
  7. १/२ कप कोमट दूध
  8. १/२ टेबल स्पून व्हिनेगर
  9. १/४ कप तेल
  10. १/२ कप साखर
  11. १/४ कप संत्र्याचा रस
  12. १ टीस्पून ऑरेंज झेस्ट
  13. केशरी रंग (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

४५ मिनिटं
  1. 1

    केक टीन ला grease करून घ्यावे.
    पॅनमध्ये 1tbsp बटर गरम करून त्यात 2tbsp साखर विरघळून कॅरमेल झालं की लगेच केक टीन मध्ये spread करावे.
    संत्र्याच्या स्लाइसचा मधला भाग काढून केक टीन मध्ये रचाव्या..मध्ये चेरी/चोकलेट/टुटी फ्रुटी ठेवावी.

    ओवन १८०°c ला preheat करावा.

  2. 2

    आता एका भांड्यात तेल(वास नसलेले कोणतेही), साखर, कोमट दूध+ विनेगर घालून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    आता चाळणीत मैदा, बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा व चिमूटभर मीठ घेऊन चाळावे... व वरील मिश्रणात घालून मिक्स करावे, खूप जास्त फेटू नये...

  4. 4

    हे मिश्रण केकटीन मध्ये ओतून टीन एकदोन वेळा (आपटावा) tap करावा.
    केकटीन प्रिहीट ओवनमध्ये २५-३० मिनिटे बेक करावा. बेक झाल्यावर केक टिन काढून त्यावर कपडा घालून झाकून ठेवावा, थंड झाल्यावर डिशमध्ये डीमोल्ड करा. मस्त कापून सर्व्ह करा, तयार आहे अपसाईड डाऊन संत्रा केक....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes