बेक्ड इंदोरी कचोरी (baked indori kachori recipe in marathi)

#cooksnap Deepali Dake Munshi यांची ही रेसिपी मी आज बनवली... थोडे ट्विस्ट देऊन....मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरून डिप फ्राय न करता बेक केली आहे.... कारण असे की सासरे हार्ट पेशंट असल्याने व त्यांना ही कचोरी खाण्याची तेवढीच उत्सुकता... म्हणून बेक्ड व्हरझन....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिठात तेल व मीठ घालून मऊसर पीठ मळून घ्यावे. आता हे पीठ दोन तासांत करिता झाकून ठेवावे.
- 2
तोपर्यंत आपण कचोरी चा मसाला वाटून घ्यावा.त्यासाठी दिलेले सर्व सुखे मसाले एका कढईत कोरडेच भाजून घ्यावे व गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी करताना त्यात हिरवी मिरची व लिंबू रस घालावा.
- 3
बटाटे उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर बटाटे सोलून किसून घ्यावेत आता ह्या बटाट्याच्या मिश्रणात वाटलेला सुक्या मसाल्यांची पूड आणि कोथिंबीर मीठ घालून छान एकजीव करावे
- 4
मळलेल्या पिठाचे दोन तास झाल्यावर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत व प्रत्येक गोळ्याची एका एकेक पारी करून घ्यावे ज्याप्रमाणे आपण मोदक करतो अगदी त्याप्रमाणे. प्रत्येक पारी मध्ये चमचाभर बटाट्याचे सारण भरावे व सर्व बाजूंनी कचोरी ते तोंड बंद करत यावे
- 5
अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्यावेत. तयार कचोरी यांना एका बी चिंचोळी मध्ये थोडेसे बटर लावून कचोरी ना एक सारखे बेकिंग ट्रे मध्ये लावून घ्यावे. वरून गरज वाटल्यास थोडेसे बटन ब्रश ने लावावे
- 6
ओव्हन 180 डिग्री सेल्सियस हिट करावा. व 15 ते 20 मिनिटांसाठी ह्या कचोऱ्या 180 डिग्रीवर बेक करून घ्याव्यात. गरमागरम टोमाटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या