अस्सल आगरी स्टाईल काळं मटण

नमस्कार! आज माझ्या पप्पानी शिकवलेली आगरी पद्धतीची काळ्या मटणाची रेसिपी शेअर करतेय. आमच्याकडे प्रत्येक सणाला, पाहुणे आले की हे काळं मटण आणि भाकरी बनतंच! या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे काळं वाटण, जे कांदा-खोबऱ्याला काळं होईपर्यंत भाजून बनवतात. चव एकदम झणझणीत आणि गावाकडची! नक्की ट्राय करा.

Steps
- 1
मटण स्वच्छ धुवून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ लावून 30 मिनिटे बाजूला ठेवा.
- 2
कढईत 2 चमचे तेल टाका. त्यात 4 कांदे आणि सुकं खोबरं, लसूण टाकून मंद आचेवर 15 मिनिटे भाजा. रंग एकदम काळा-तपकिरी होईपर्यंत भाजा, पण जाळू नका! थंड झाल्यावर थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक काळी पेस्ट बनवा. हाच खरा काळा रस्सा!
- 3
मोठ्या पातेल्यात 1 वाटी तेल गरम करा. त्यात 1 बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परता. आता मॅरीनेट केलेलं मटण टाका आणि मोठ्या आचेवर 10 मिनिटे चांगलं परतून घ्या.
- 4
आता त्यात आपण बनवलेलं काळं वाटण, आगरी काळा मसाला, लाल तिखट टाका. चांगलं हलवून 5 मिनिटे परता. आता 3 ग्लास गरम पाणी आणि मीठ टाका.
- 5
कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढा किंवा पातेल्यात झाकण ठेवून 1 तास मंद आचेवर दम देऊन शिजवा. मटण एकदम मऊ झालं पाहिजे.
- 6
गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका 30 मिनिटे झाकून ठेवा म्हणजे रस्सा मटणात मुरेल.
Tips
आगरी काळं मटण नेहमी लोखंडी कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात छान होतं.
तेलावर कंजूसी करू नका, काळ्या रस्स्याला तेल सुटलं की समजायचं रस्सा तयार झाला.
गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाण्याने चव बिघडते.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sona Patil know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Similar Recipes
More Recipes
-

Guruji Kitchen
-

Rita Talukdar Adak
-

Kurkurit Upvasacha Sabudana Vada
Sona Patil
-

Gavran Bharleli Bhendi - Chulivarchi Chav
Sona Patil
-

Sona Patil
-

Sona Patil
-

Mridula Srivastava
-

Swaminathan.V
-

Brown Sugar & Vanilla Cupcakes with Earl Grey Frosting & Blackberry Macaron
Cupful of Sprinkles
-

Sarvat Hanif
-

Gmagolicho -

Rehana Wasim
-

Hema Wane
-

Sanuber Ashrafi

Comments