उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
उकडीचे मोदक
22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे.
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक
उकडीचे मोदक
22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे.
कुकिंग सूचना
- 1
साहित्य: तांदळाचे पीठ, पाणी, तुप, मीठ, ओले नारळचे खोबरे, गुळ, बदाम, लवग, काळीमिरी, दुध
- 2
प्रथम ओल्या नारळाचे खोबरे किसून बारीक करून घ्या. त्यानंतर कढईमध्ये खोबरं आणि दोन टेबलस्पून तूप ॲड करून पाच मिनिट परतून घेणे. आता यामध्ये एक वाटी गुळ ॲड करून घेणे सर्व छान मिक्स करून घेणे. आणि आता यामध्ये दूध घालून सर्व सारण एकजीव होऊ पर्यंत ढवळत राहा.
- 3
मग यात लवंग कालिमिरी चा पावडर आणि बदाम टाकून मिश्रण एकजीव करुन घेणे. आपले सारण तयार.
- 4
आता एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून तूप घालुन उकळी आणणे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ ॲड करणे आणि एक सारखे हे मिश्रण हलवणे मिश्रण थोडे घट्टसर झाले की गॅस बंद करणे आणि झाकण ठेवून 5-10 मिनिटे मिश्रण तसेच ठेवणे. मोदकाचे पिठ तयार.
- 5
आता 5 मिनिटानंतर मोदकाचे पिठ छान मळून घेणे. आता सर्वप्रथम मोदकाचे पिठचे एक छोटा गोळा घेऊन थोडं तूप लावून त्याला हाताच्या साह्याने गोल वाटीसारखं बनवून घ्यायचं. त्यानंतर तीन बोटाच्या साहाय्याने त्याला कळ्या पाडायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये सारण घालून त्या कडा बंद करून त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. अशाप्रकारे आपण अजून मोदक तयार करून घेऊ या.
- 6
आता तयार केलेले मोदक उकडण्यासाठी गॅसवर कढईत ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करणे पाण्याला उकळी आल्यावर एका चाळणी मध्ये केलिची पाने ठेवून त्याच्या वर तयार केलेले सर्व मोदक ठेवणे आणि छान 10-15 मिनिटे वाफवून घेणे.
- 7
आता हे वाफवलेले मोदक थंड झाल्यावर. एका प्लेट मध्ये सर्व्ह करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या (3)