टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#रेसिपीबुक #week10
#मोदक
पारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहे
माझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत .

टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
पारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहे
माझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
10 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदळाचे पीठ
  2. 1आणि 1/4 वाटी पाणी
  3. 4 टेबलस्पूनदूध साधारण
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 1 वाटीपुरण
  6. 1 वाटीओल्या खोबऱ्याचे सारण
  7. पुरणाचे सारण
  8. 1/2 वाटीहरभरा डाळ
  9. 1/2 वाटीगूळ
  10. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  11. 1 टिस्पून हळद
  12. गुळ खोबऱ्याचे सारण
  13. 1 वाटीओल्या नारळाचा कीस
  14. 1 वाटीगुळ
  15. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  16. 1 टेबलस्पूनदूध मसाला पावडर
  17. 1 टेबलस्पूनतूप
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम ओल्या नारळाचे खोबरे किसून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.त्यानंतर कढईमध्ये खोबरं आणि दोन टेबलस्पून तूप ॲड करून पाच मिनिट परतून घेणे.आता यामध्ये एक वाटी गुळ आणि वेलची पावडर ॲड करून घेणे सर्व छान मिक्स करून घेणे.आणि आता यामध्ये दूध मसाला पावडर घालून सर्व सारण एकजीव होऊ पर्यंत हलवून घेणे.आपले सारण तयार.

  2. 2

    आता पुरण तयार करून घ्या.त्यासाठी हरभरा डाळ धुवून घ्या नंतर एक तासभर भिजत घाला नंतर यामध्ये हळद आणि तेल टाकून डाळ कुकरमध्ये छान शिजवून घ्या.साधारण पण पाच ते सहा शिट्ट्या करा.

  3. 3

    डाळ शिजवल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या आणि एका कढईमध्ये मध्यम आचेवर ती डाळ गरम करा डाळ थोडी गरम झाल्यावर त्यामध्ये गूळ ॲड करा गुळ वितळून छान डाळीमध्ये मिक्स होऊ द्या, आता यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर ॲड करा आणि थोडासा दाटपणा येऊ पर्यंत मध्यम आचेवर मिश्रण शिजवून घ्या.आता हे मिश्रण पुरणाच्या चाळणीमधून किंवा मिक्सर मधून बारीक करून घ्या आपलं पुरण तयार झाले.

  4. 4

    आता एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून तूप घालुन उकळी आणणे. आता यामध्ये दूध ऍड करावे आणि उकळी आणावी आता या उकळलेल्या पाण्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ ॲड करणे आणि एक सारखे हे मिश्रण हलवणे मिश्रण थोडे घट्टसर झाले की गॅस बंद करणे आणि झाकण ठेवून ५-८ मिनिटे मिश्रण तसेच ठेवणे मोदकाची उकड तयार

  5. 5

    आता ५ मिनिटानंतर उकड छान मळून घेणे. आणि त्याचे 2 समान भाग करणे त्यातील एका भागामध्ये खाण्याचा पिवळा रंग आहे ॲड करावा आणि मळून घेणे. आता यांचे छोटे-छोटे आकाराचे गोळे करून घेणे आणि खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे मोदकाच्या मोल्ड वरती पिवळ्या रंगाचे गोळे प्रेस करून घेणे.

  6. 6

    प्रथम पुरणाचे मोदक खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे आकाराने थोडेसे लहान बनवून घेणे. आणि यानंतर व खोबऱ्याचे मोदक आकाराने पुरणाच्या मोदक पेक्षा थोडेसे मोठे बनवून घेणे.

  7. 7

    आता कलश मोदक बनवत असल्याकारणाने गूळ खोबऱ्याचा मोठा बनविलेला मोदक आणि त्याच्यावरती पुरणाचा मोदक ठेवणे. कलश प्रमाणे ठेवणे पुरणाचे मोदक स्टिक होण्यासाठी थोडसं उकडीचे एक लाटे तयार करून खाली फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवणे.आणि त्यावर ते पुरणाचे मोदक ठेवणे अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊन.

  8. 8

    आता तयार केलेले मोदक उकडण्यासाठी गॅसवर कढईत ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करणे पाण्याला उकळी आल्यावर एका चाळणी मध्ये एक सुती कापड ठेवून त्याच्या वरती तयार केलेले सर्व मोदक ठेवणे, आणि 2-3 मिनिटे वाफवून घेणे. तूप टाकून नैवेद्य करणे.

  9. 9

    हळुवार चाळणीतून काढून घेणे अतिशय सुंदर असे कलश मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes