पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
महाराष्ट्राचे फेमस फूड म्हणून ओळखली जाणारी पुरणपोळी. महाराष्ट्रात पाहुण्यांचे पहिले आगमन, सणांनां, नैवैद्यसाठी हमखास बनवली जाणारी पुरणपोळी ह्या पोळी ला तुपा सोबत, दुधा सोबत, आमटी सोबत आणि आमरस सोबत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पसंती नुसार खाल्ली जाते. जेवढी सुबक दिसते तेव्हडीच चवीला सुंदर, छान लागते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ धुऊन घ्या, कुक्करमध्ये 4 शिट्या करून घ्या. डाळ मऊ शिजली पाहिजे. नंतर डाळीतील पाणी गाळून घ्या. गॅसवर एका कढईत शिजवलेली फक्त डाळ घाला. डाळ पूर्ण पणे कोरडी झाली की त्यात गूळ वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. गूळ वितळला की, मिश्रण पातळ होईल, तसेच सतत हलवून रहा. मिश्रनाचा गोळा होऊ लागतो. गॅस बंद करा पुरण थंड झाले की, पुरणाच्या चाळणीतून बारीक करून घ्या.
- 2
पिठाचे छोटे गोळा घ्या त्याची पारी करून त्यात पुरण भरा, आणि पारी बंद करा. पोळपाटावर पेपर ठेवा त्यावर पीठ शिंपडून पोळी लाटून घ्या. आणि छान भाजून घ्या.
- 3
तुपा सोबत किंवा दुधा सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या