भरलेला पापलेट आणि कोलंबी फ्राय (bharlele paplet and kolambi fry recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#फ्राईड रेसिपी 2
पांच साधारण मोठ्या आकाराचे पापलेट आणि मोठी कोळंबी market मधून घेतली. मुलींनी भरलेला पापलेट चा आग्रह धरला तेव्हा कोळंबी फ्राय, दोन भरलेले पापलेट आणि उरलेलं तीन पापलेट चे कालवण केलं.

भरलेला पापलेट आणि कोलंबी फ्राय (bharlele paplet and kolambi fry recipe in marathi)

#फ्राईड रेसिपी 2
पांच साधारण मोठ्या आकाराचे पापलेट आणि मोठी कोळंबी market मधून घेतली. मुलींनी भरलेला पापलेट चा आग्रह धरला तेव्हा कोळंबी फ्राय, दोन भरलेले पापलेट आणि उरलेलं तीन पापलेट चे कालवण केलं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 पापलेट
  2. 10 मोठी कोळंबी
  3. 1/2 टिस्पून हळद
  4. 1/2 टिस्पून आले-लसूण पेस्ट
  5. 1 टिस्पून कोळी मसाला
  6. चवीनुसार मीठ
  7. 1/2 टिस्पून जिरेपूड
  8. 1/2 टिस्पून गरम मसाला
  9. 1 लिंबू
  10. चटणी वाटप साहित्य
  11. 1/4 कप किसलेल नारल
  12. 2 हिरव्या मिरच्या
  13. 2 टेबलस्पून थोडीशी कोथंबीर
  14. 4 लसणाच्या पाकळ्या
  15. 1/2 इंच आल

कुकिंग सूचना

30-40 मि
  1. 1

    पापलेट चे पंख व शेपूट कापून, नंतर पोटाच्या बाजूने चीर देऊन स्वच्छ धुवून घ्यावेत. कोळंबी स्वच्छ आणि डिव्हिनिंग केल्यानंतर त्यांना पाण्याने चांगले धुवा आणि जास्तीचे पाणी काढून टाका. कोळंबी च्या डोक्याच्या बाजूला काळा धागा पकडून तो अलगद काढून टाकावा. जेणेकरून कोळंबी खाल्ल्यानंतर पोटाला त्रास नाही होणार.

  2. 2

    पापलेट व कोळंबी ला हळद, आले-लसूण पेस्ट, कोळी मसाला व मीठ चोळून ठेवावे. वाटून घेतलेली चटणी मध्ये एक टे-स्पून तेल, 1/2 स्पून जिरे पूड, 1/2 स्पून गरम मसाला, किंचित मीठ घालून स्लो गॅस वर 5 मिनिटे शिजून घ्या. ही चटणी पापलेट च्या पोटात भरावी. थोडीशी चटणी चा हात पापलेट व कोळंबी चा वरून फिरवून त्यावर लिंबू पिळून रस मिसळून घ्यावे. कमीतकमी 15 मिनिटे किंवा 1/2 तास मॅरीनेट ठेवा. फ्रिज मध्ये ठेवले तर अधिक चांगले मॅरीनेट होईल.

  3. 3

    पापलेट रव्यामध्ये किंवा ब्रेडक्रम्समध्ये घोळवून प्रथम चटणी नाही भरलेली बाजू तळून घ्यावे. ब्रेडक्रंब किंवा रवामध्ये पापलेट आणि कोळंबी मिसळल्याने ते कुरकुरीत होते. माझ्याकडे यापैकी काहीही उपलब्ध नसल्याने मी त्याशिवाय तळले. मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन किंवा तव्या मध्ये तेल गरम झाले कि त्यात पापलेट दोन्ही बाजूंनी उथळ तळणे. साधारण 6-7 मिनिटांत एक पापलेट दोन्ही बाजूंनी तळून होतात.

  4. 4

    पापलेट तळून झाल्यावर त्यात गरम तेला मध्ये कोळंबी घाला. कोळंबी सुमारे 10 -15 मिनिटे शिजवा आणि दरम्यान ढवळून घ्या. त्यातील पहिले 7-8 मिनिट तव्यावर झाकण ठेवावे जेणेकरून कोळंबी लवकर शिजते. पापलेट आणि कोळंबी तळून झाले की त्यावर लिंबाचा रस शिंपडा (पर्यायी). कोथिंबीरने सजवा.
    नंतर भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

टिप्पण्या

Similar Recipes