बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. पूर्णपणे मराठी टच आहे बाकरवाडीला. शेंगदाणे आणि आपले सुखे खोबरे मिश्रण करून.
खूप छान बाकरवड्या झाल्या आहेत कुरकुरीत.
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. पूर्णपणे मराठी टच आहे बाकरवाडीला. शेंगदाणे आणि आपले सुखे खोबरे मिश्रण करून.
खूप छान बाकरवड्या झाल्या आहेत कुरकुरीत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैद्याच्या पीठात हळद, मीठ, हिंग घालून पीठ मिक्स करून घ्या. आता त्यात गरम कडकडीत तेल घालून चमच्याने मिक्स करून नंतर हातानी चोळून पीठ मिक्स करा. पिठाचे मुटके होतील असे पीठ करून घ्या. नंतर त्यात गरजे नुसार पाणी घालून पीठ घट्ट मळून, 15 मिनिट झाकून ठेवा.
- 2
तोपर्यंत पुढची तयारी करा. मिक्सर भांड्यात खोबरे, शेंगदाणे कूट, मीठ, तिखट, हिंग, हळद, भरड, साखर एकत्र करून वाटून घ्या. 15 मिनिटांनी पीठ पुन्हा 1 मिनिट मळून त्याची पोळी लाटून घ्या. आता त्यावर चिंच गूळ कोळ लावा त्यावर वाटून घेतलेले मिश्रण घाला आणि दाब देत रोल करून घ्या आणि बकर वड्या सुरीच्या सहाय्याने कट करून घ्या. वाड्यांना हलके प्रेस करू. घ्या.
- 3
गरम तेलात मंद गॅसवर तळून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या