मटकी कबाब स्टिक्स (matki kabab stick recipe in marathi)

#KDR मोड आलेली मटकी म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती 'मिसळ'. कधी जस्ट फॉर चेंज म्हणून सलाड, कधी उसळ, तर कधी बटाटा घालून केलेला रस्सा! काही ठिकाणी मटकीच्या डाळीची आमटी आणि सांडगे ही बनवतात.
मोड आलेल्या मटकीमध्ये पोटाशिअम,माग्नेशिअम, आयर्न, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन बी 6 ठासून भरलेली असतात.
इतकी अष्टपैलू असूनही महाराष्ट्रामध्ये मटकीच्या नावावर फार कमी रेसिपीज् आहेत. ९ जुलै "आंतरराष्ट्रीय कबाब दिवसानिमित्त" ह्याच मटकीची जरा 'हटके' रेसिपी ट्राय केली. स्टार्टर म्हणून परफेक्ट आणि लहानांपासून मोठ्ठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे मोड आलेल्या मटकी चे कबाब!

कुकिंग सूचना
- 1
मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून उकळलेल्या पाण्यात घालून झाकून ठेवावी. आपल्याला मटकी शिजवायची नाही फक्त हलकीशी मऊ करायची आहे.
- 2
नंतर, मटकी निथळून घ्यावी आणि सगळ्या गोष्टीं बरोबर मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. वाटताना पाणी शक्यतो घालू नये पण अगदीच आवश्यक असल्यास १ ते २ चमचे पाणी घालत वाटावे.
- 3
कधी कधी मिश्रण बरंच पातळ होतं की त्याला कबाबचा आकार देणं अवघड होतं. अशावेळी, बायंडिंग म्हणून पोह्याची पावडर वापरावी.
- 4
तयार मिश्रणाचा एक गोळा पॉप्सिकल् स्टिक वर ठेवून त्याला आवडीचा आकार द्यावा.
- 5
नंतर, एका नॉनस्टिक तव्यावर थोडंसं तेल पसरवून तयार कबाब दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावे.
- 6
टोमॅटो केचप, आंबटगोड चटणी किंवा पुदिन्याच्या दह्यातल्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)