मटका-ए-मोहोब्बत (matka ye mohobat recipe in marathi)

#ICR हो हो.. मला माहित आहे, व्हैलेंटाईन डे फक्त फेब्रुवारी महिन्यात च साजरा करतात.😂 पण, हे आहे माझे आईस्क्रीम वरचे प्रेम! एकतर, इकडचा भन्नाट उन्हाळा आणि त्यात कधीतरी गारेगार खायची तल्लफ येते.. म्हणूनच मी आज "नो कुकिंग" मटका कुल्फी तुम्हां सर्वांसोबत शेअर करतेय.. लहान मुलांना ही बनवता येईल अशी सोप्पी रेसिपी.. आणि अर्थातच, आईस्क्रीम स्पर्शाला जरी थंड असले तरीही त्याचा विपाक (तासिर) भलताच उष्ण असतो. त्या उष्णतेला आळा घालण्यासाठी मस्त गुलाबी "गुलकंद" वापरलाय. "मस्ट ट्राय" रेसिपी आहे.. नक्की करून पहा..

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात क्रीम, मिल्क, मिल्क पावडर, रोझ सिरप, कन्डेन्स्ड मिल्क आणि १ चमचा गुलकंद काढून घ्यावे.
- 2
मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे आणि मटक्यांमध्ये भरावे.
- 3
फॉईल पेपरने कव्हर करण्यापूर्वी त्यावर थोड्या पिस्त्याच्या कापांसोबत सजावट करावी.
- 4
साधारण, ७ - ८ तासांत आईस्क्रीम सेट होते. खायला घेण्यापूर्वी कुल्फी ५ मिनिटे बाहेर ठेवून मग खायला घ्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (14)