पाटवडी (थापीवडी) (patwadi recipe in marathi)

#MD
"आई" तुझ्याविना हा पहिलाच मदर्स डे! तुझी उणीव कधीही भरून न निघणारी..जगातील सर्वोत्कृष्ट सुगरण असलेल्या माझ्या आईला ही तिचीच "पाटवडी" ची रेसिपी समर्पित!
माझ्यासारखंच माझ्या लेकाला ही आईची पाटवडी भुरळ घालते. त्यानिमित्ताने माझेही मन पुन्हापुन्हा भूतकाळात जाते. गणपतीमध्ये गौरी जेवतात त्या दिवशी भाजी-भाकरी-वडी चा प्रसाद, ओढ्यावरच्या रेणुका देवीचा थालीपीठ-उसळ-वडी चा नैवेद्य, वास्तुशांती/मुहूर्तमेढ चा गारवा म्हणून पुन्हा भाजी-भाकरी-वडी चा मान ... अशा अनेक वेळा पाटवडी घरी झालीच पाहिजे.. तर ही आहे झणझणीत, चटपटीत अशी आईच्या हातची पाटवडी ..

कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी, आलं - लसूण पेस्ट + हिरवी मिरची + जीरे मिक्सरमध्ये जास्त पाणी न वापरता भरभरीत वाटून घ्यावे.
- 2
नंतर, एका मोठ्या कढईत तेल तापवून मोहोरी, हिंगाची नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. मग त्यात वाटलेली पेस्ट, हळद घालून मिश्रण परतावे.
- 3
कडेने तेल सुटेतोवर परतवून त्यात पाणी घालावे.
- 4
पाण्यात थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालून पाण्याला एक उकळी आणावी. उकळी आल्यावर पटपट एका हाताने पीठ रोवत दुसऱ्या हाताने उलथण्यानेमिश्रण हलवत रहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
- 5
घट्ट गोळा होईपर्यंत पीठ रोवत रहावे. गोळा तयार झाला की आच पूर्ण बंद करून कढई २ मिनिटांसाठी झाकण लावून ठेवावी.
- 6
तोवर पटकन् ताटाला तेलाचं बोट फिरवून तयार पिठल्याचा गोळा त्यावर थापून घ्यावा. आवडीच्या आकारात कट करून ओले खोबरे भुरभुरून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
- राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
- पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
- बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)

टिप्पण्या (4)