टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#pcr

प्रेशर कुकर सर्व गृहिणींचा एक जिवलग मित्र आहे असेच म्हणेन मी, घाई गडबडीच्या प्रसंगी आपल्या मदतीला अनेकदा धावून येतो.
घंटो का काम मिनटोमें होते ते या प्रेशर कुकरमुळेच!!
माझ्या बेकिंगला सुरुवात झाली ते या प्रेशर कुकरमुळेच , घरी OTG नसल्यामुळे अनेकदा मी केक्स कुकरमध्ये बनवून माझ्या केकच्या
ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत...😊
पण नवीन घरी नवीन otg आल्यावर सुद्धा खास माझ्यासाठी किंवा मुलांसाठी केक बनवायचा असतो तेव्हा मी नेहमी कुकरमधेच ,केक बनवते.
OTG पेक्षा कुकरमधेच केक छान बनतो. व सर्व बाजूंनी एक सारखा बेक होतो. माझ्या बेकिंगची सुरवात मी ,माव्या केक पासूनच केली होती...😊
म्हणून आज प्रेशर कुकर थीम साठी मी आज माझी ही रेसिपी सादर करत आहे...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० ते ४५ मि.
५ ते ८ सर्व्हिं
  1. 1-1/2 कप मैदा
  2. 1 कपपिठीसाखर
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. 3/4 कपदूध
  5. 1/4 कपदूध माव्यासाठी
  6. बदाम पिस्त्याचे काप
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडाा
  9. १०० ग्रॅम बटर
  10. 1 टेबलस्पूनबटर माव्यासाठी
  11. 1/4 कपदही

कुकिंग सूचना

४० ते ४५ मि.
  1. 1

    पॅनमधे १ टेबलस्पून बटर,मिल्क पावडर,१/४ कप दूध छान मिक्स करून मग गॅस चालू करून छान मिक्स करून घ्या‌.हळहळू मिश्रण दाटसर होईल. मिश्रण सोडून कुठेही न जाता सतत परतत राहा‌. थोड्या वेळातच मावा तयार होईल. थंड करून घ्या.

  2. 2

    बाऊलमधे १०० ग्रॅम, पिठीसाखर घालून स्मूद होईपर्यंत बीट करून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात चाळणीमधे मैदा,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा चाळून cut & fold मेथडने मिक्स करा.नंतर त्यात दूध घालून,,दही,तयार मावा हाताने कुस्करून व्यवस्थित मिक्स करा.over mixing करू‌ नये.

  4. 4

    छान स्मूद मिक्सिंग झाल्यावर केक टिन ग्रीसिंग करून त्यात हे मिश्रण ओतून वरून ड्रायफ्रूटस घालून कुकर प्रीहीट करून त्यात रिंग ठेऊन शिट्टी,रबर रिंग काढून झाकण लावून केक ४० ते ४५ मि.बेक करा.

  5. 5

    टूथपिकने एकदा चेक करून केक झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या. थंड करून हव्या त्या आकारात कट करून चहासोबत सर्व्ह करा‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes