शेपूची पातळ भाजी (Shepuchi Patal Bhaji Recipe In Marathi)

#ChooseToCook
शेपू हि आरोग्य वर्धक आहे
शेपूची पातळ भाजी (Shepuchi Patal Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCook
शेपू हि आरोग्य वर्धक आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेपू स्वच्छ धुऊन घ्यावी
त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळून घ्यावे व गॅस बंद करून त्यात शेपू टाकावी २-३ मिनिटे ती त्यात राहू द्यावी - 2
नंतर एका दुसऱ्या भांड्यात बर्फाचे पाणी घेऊन त्यात उकळत्या पाण्यातील शेपू टाकावी.(बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे शेपूचा रंग बदलणार नाही)
- 3
टोमॅटो कांदा लसूण आले मिरची हे सर्व मिक्सरवर वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी
- 4
तसेच शेपूही मिक्सरला वाटून त्याची प्युरी करून घ्यावी
- 5
गॅस सुरु करून त्यावर एक पॅन ठेवावा, पॅन गरम झाला कि त्यात २ चमचे तूप घालून घ्यावे त्यात २ लवंग दालचिनीचा तुकडा, धने पूड, जिरेपूड, मिरपूड, हळद, मसाला घालून फोडणी करावी
- 6
त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो कांद्याची प्युरी घालावी
- 7
1/2 वाटी भिजवलेली मूग डाळ घालावीव एक वाफ काढून घ्यावी
- 8
त्यानंतर त्यामध्ये २ चमचे दही घालावे व एकत्र करून घ्यावे
- 9
त्यानंतर त्यामध्ये शेपूची वाटून घेतलेली प्युरी घालावी
- 10
आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे व शेपूची पातळ भाजी ५-१० मिनिटे शिजू द्यावी
- 11
५-१० मिनिटे शिजल्यावर आपली शेपूची पातळ भाजी तयार
- 12
ही भाजी चपाती, भाकरी किंवा भात या कशाही बरोबर छान लागते
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या