मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#ChooseToCook
अतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो

मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)

#ChooseToCook
अतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीमुगडाळ, दोन छोटे चमचे तांदूळ
  2. प्रत्येकी अर्धी वाटी सिमला मिरची, टोमॅटो कांदा बारीक कापलेली,अर्धी वाटी मक्याचे दाणे
  3. 2 टेबलस्पूनबटर
  4. 1/2 वाटीकोथिंबीर चिरून बारीक चिरलेली
  5. 4मिरच्या, एक इंच आलं
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 चमचेइनो
  8. 1/4 चमचाहिंग, पाव चमचा हळद,अर्धा चमचा तिखट

कुकिंग सूचना

35मिनिटे
  1. 1

    मुगडाळ व तांदूळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तासासाठी भिजवावे मग ते पाणी काढून टाकून त्यात मिरची व आलं टाकून बारीक वाटावे वाटताना थोडंसं पाणी टाकून वाटावं मग त्यामध्ये हिंग हळद तिखट मीठ व लागेल तास पाणी घालून छान फेटावं पीठ फेटल्याने ते हलकं होतं

  2. 2

    फ्राय पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये बटर घालावं व वाटलेला पिठातल थोडंसं पीठ घेऊन त्यात थोडा कांदा,सिमला,मका,टोमॅटो, कोथिंबीर घालून एकजीव करावे व मग पाव चमचा इनो घालून एकजीव करावे व बटर घातलेल्या पॅन वर मिश्रण ओतावे

  3. 3

    मिश्रण आपोआप पसरते साईड ने बटर घालावे त्यावर झाकण ठेवावे पाच मिनिटांमध्ये मिडीयम गॅसवर एक साईडने छान सोनेरी रंगावर ते भाजले जाते मग त्याला उलटावे परत बटर घालावे व झाकण ठेवून दुसऱ्या साईडने सोनेरी होऊ द्यावे मग त्याला कटिंग करून परत त्यामध्ये बटर सोडून छान मिडीयम गॅसवर खरपूस भाजून घ्यावे

  4. 4

    करून बटर सोडल्याने आतपर्यंत बटर जाऊन त्याचा सुंदर सुवास येतो व खमंग होते असे हे मुगलेट चटणी आणि सॉस बरोबर आपण. रीतीने सर्व उरलेले बुकलेट आपण करावे थोडा वेळ लागतो थोडे जाड असतात पण चवीला अप्रतिम लागतात पौष्टिक व पोटभरीचा असा हा नाष्टा किंवा रात्रीचे जेवण होऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes