पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)

आरोग्यदायी असा हा राईस आहे
पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
आरोग्यदायी असा हा राईस आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम १ १/२ वाटी तांदूळ धुऊन १० मिनिटे बाजूला ठेऊन द्यावा
- 2
त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण हिरव्या मिरच्या यांची पेस्ट तयार करून घ्यावी
- 3
नंतर गॅस सुरु करून त्यावर कुकर ठेवावा त्यात २ चमचे तूप घालून त्यामध्ये १/४ चमचा जीरे, ४ मिरी, २ लवंग, दालचिनी, तमालपत्र, हिरवी मिरची असे फोडणीत द्यावे
- 4
हे सर्व तडतडले कि त्यामध्ये कांदा गुलाबी राणापर्यंत परतून घ्यावा, नंतर त्यात टोमॅटो घालावा व तो शिजू द्यावा. १/४ चमचा हळद घालावी
- 5
त्यानंतर त्यामधे आले लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावे,त्यामध्ये शेंगदाणे व तयार पुदिन्याची पेस्ट घालावी
- 6
नंतर धुऊन बाजूला ठेवलेला तांदूळ त्यामध्ये घालावा व सर्व एकजीव करून घ्यावे
- 7
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे (१ १/२ तांदुळाला ३ कप पाणी उकळून ओतावे)तसेच चवीनुसार मीठ व १ चमचा लिंबाचा रस घालावा
- 8
कुकरचे झाकण बंद करून ३ शिट्ट्या काढाव्यात कि आपला पुदिना राईस तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या