गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)

#HR1 ... होळीच्या दिवशी मस्त गोड पुरणपोळी खाल्यानंतर काहीतरी चटकदार, तिखट खायला पाहिजे.. म्हणून आज केले आहेत गावरानी चणे आणि तुरी चे, चाकवत भाजी घातलेले, वडे..

कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला चणे आणि तुरी निवडून घ्याव्या. 7-8 तास भिजत घालाव्यात. त्यानंतर त्यातून पाणी काढून घ्यावे. आता त्यात आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालावा. सोबतच चाकवत भाजी धुवून घ्यावी आणि बारीक चिरून घ्यावी.
- 2
चणा आणि तुरी मिक्सर मधून जाडसर वाटून घ्याव्यात.
- 3
तयार वाटण एका वाडग्यात काढून, त्यात बारीक चिरलेला कांदा, चाकवत भाजी, थोडी कोथिंबीर, बेसन हळद, जिरेपूड, धणे पूड आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- 4
सर्व चांगले मिक्स करून घ्यावे.
- 5
आता एका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यावर, त्यात तयार मीश्रणाचे, हातावर थापून, वडे टाकावे.
- 6
छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. तळलेले वडे, टिश्यू पेपरवर काढून घ्यावे.
- 7
अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्यावेत. मस्त चटकदार गरमागरम वड्यांचा नाश्ता.. टोमॅटो सॉस किंवा केचप सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रवेदार गाजर हलवा (Ravedar Gajar Halwa Recipe In Marathi)
- ओनीयन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
- लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
- घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
- कंदी पेढ्यांची पोळी (Kandi Pedhachi Poli Recipe In Marathi)

टिप्पण्या (5)